तेली समाजातील महान विभुती (भाग 5) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
झांशी येथील रामशहा यातेली व्यापार्याच्या पोटी कर्माबाईंच्या जन्म चैत्र व ॥ 11 शके 1073 मध्ये झाला. बालपण लाडात गेले. पुढे नरवर येथील मोठ्या व्यापार्याशी लग्न झाले मात्र लवकरच वैधव्य आले आणि विरक्ती येऊन सासू सासरे आणि दोन मुलांना सोडून त्यांनी जगन्नाथपुरीचा रस्ता धरला रात्रंदिवस प्रवास करून भूकेने गळीतगात्र झालेल्या कर्माबाई मंदिराजवळ पोहोचल्या मात्र त्यांचा अवतार बघून द्वारपालाने त्यांना ढकलून दिले. मंदिराच्या दारात एका दगडावर आपटून त्या बेशुद्ध झाल्या. द्वारपालांने त्यांना उचलून नदीच्या काठावर नेऊन टाकले. त्या शुद्धीवर आल्या तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर बसले आणि आई मला भरव ! असे म्हणू लागले.कर्माबाईंनी प्रेमाने भगवंताला खिचडी भरवली आणि देवळातल्या नैवेद्याआधी मी तुझ्या हातची खिचडी खायला येईन असे वचन दिले. आजही जगन्नाथाला तो नैवैद्य दाखवतात याला कर्माबाईंची खिचडी असेच म्हणतात.