तेली समाजातील महान विभुती (भाग 6) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात पिंपळगाव येथे गोटीरामबाबांचा जन्म झाला. अतिशय हुड असणारा हा मुलगा मंगलदास बाबांच्या सहवासात आल्यावर बदलून गेला. रोज सकाळी सुर्योदयापूर्वी उठायचे 4 मैलांवर असणार्या हमरापूर गावी पोहत गोदावरीत स्नान करायचे आणि ओल्या धोतरावर मारूतीला प्रदक्षिणा घालायची असा त्यांचा क्रम सुरू झाला. पुढे बाबांनी गावात शंकराचे मंदिर बांधले. बाजुलाच लक्ष्मीनारायण आणि सावता माळ्याचे मंदिर बांधले. आजुबाजुचा 200 एकर परिसर झाडे लावून सुंदर बनवला. या परिसराला प्रतीपंढरपूरचे स्वरूप आले आहे. बाबांच्या आशीर्वादाने अनेकांना लाभ झाल्याचे भाविक सांगातात. दिवसेंदिवस या तीर्थस्थळाला गर्दी वाढत आहे.