परभणी हे शिक्षणाचे माहेरघर कसे बनेल यादृष्टीने आपण प्रयत्न करू असे आश्वासन आ.डॉ. राहूल पाटील यांनी दिले. तेली समाज परभणी, महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा शाखेतर्फे नवा मोंढ्यातील रोकडा हनुमान मंदिरात गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. विदर्भासह मराठवाड्यातील विद्यार्थी देखील शिक्षण घेण्यासाठी परभणीत दाखल होत आहेत. ही बाब कौतुकास्पद असून शैक्षणिक सुविधा सोई सवलती मिळाव्यात यादृष्टीने आपण निश्चीत प्रयत्न करू असे ते म्हणाले.
यावेळी प्रदीप फाले, पोलिस निरिक्षक अनिल गव्हाणकर, प्रा. गजानन काकडे, डॉ.प्रा.रावसाहेब राऊत, प्रा.वाघमारे सर, प्रा.काशिनाथ सालमोटे, भास्कराव देवडे, आशाताई नखाते, रामप्पा दावलबाजे, निळकंठ राऊत, संजय गौरकर, ज्ञानेश्वर सरकाळे, प्रल्हाद देवडे, शांतीलिंग काळे,भरदमकर, रत्नाकर सुर्यवंशी, प्रल्हाद भिसे, उमाकांत मेहत्रे,भिमाशंकर व्यवहारे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मन्मथ देशमाने, किरण क्षीरसागर, आकाश भिसे, निखिल खंदारे, राजेंद्र राऊत, सुधीर सोनूकर,शंकर फुटके, पुरुषोत्तम देवडे, संतोष माने, पवन राऊत, सतिष खंदारे, माने आदीनी पुढाकार घेतला. सूत्रसंचलन डॉ.नागनाथ सरकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रावसाहेब राऊत यांनी मानले.