अहमदनगर जिल्हा तेली समाज सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी आवाहन

         सनई - १२ ऑक्टोबर २०१९ रोजी साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळ्याचे श्री.क्षेत्र शिर्डी ता. राहता, जिल्हा-नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका विवाह समारंभात वधू-वर नाव नोंदणी फार्म देऊन एक आगळे वेगळे नाव नोंदणी अभियान नाशिक जिल्हाविभागीय महिला संघटनेचे अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांच्या हस्ते राबवून समाज बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विवाहाच्या निमित्ताने करण्यात आले.

         या वेळी नगर-औरंगाबाद रोडवरील रुंदावन मंगल कार्यालयात तेली समाजाच्या वतीने बैठकीत या सामुदायिक विवाहामुळे गोरगरिबांना आर्थिक झळ न बसता एकमेकांचे संसार उभे राहून एक वेगळे नात तयार होणार असून यात वेळ, आर्थिक प्रश्न, मानसिक त्रास वाचणार आहे. यासाठी सोशल मीडियावर माहिती उपलब्ध करून नाव नोंदणीसाठी पदाधिकारी घरो घरी जाऊन प्रभोधन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी प्रत्येक समाज बांधवांनी हा मेळावा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

दिनांक 23-07-2019 00:56:54
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in