सनई - १२ ऑक्टोबर २०१९ रोजी साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळ्याचे श्री.क्षेत्र शिर्डी ता. राहता, जिल्हा-नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका विवाह समारंभात वधू-वर नाव नोंदणी फार्म देऊन एक आगळे वेगळे नाव नोंदणी अभियान नाशिक जिल्हाविभागीय महिला संघटनेचे अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांच्या हस्ते राबवून समाज बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विवाहाच्या निमित्ताने करण्यात आले.
या वेळी नगर-औरंगाबाद रोडवरील रुंदावन मंगल कार्यालयात तेली समाजाच्या वतीने बैठकीत या सामुदायिक विवाहामुळे गोरगरिबांना आर्थिक झळ न बसता एकमेकांचे संसार उभे राहून एक वेगळे नात तयार होणार असून यात वेळ, आर्थिक प्रश्न, मानसिक त्रास वाचणार आहे. यासाठी सोशल मीडियावर माहिती उपलब्ध करून नाव नोंदणीसाठी पदाधिकारी घरो घरी जाऊन प्रभोधन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी प्रत्येक समाज बांधवांनी हा मेळावा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade