( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
श्री. धोंडीबा राऊत हे एक माळकरी व टाळकरी. शिक्षण जेमतेम झालेले जेमतेम शिक्षणावर पगार देणारी पोष्टमनची नोकरी करीत. तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्यावर इंदोरी हे बर्यापैकी गाव. या गावच्या बाजारपेठेत छोटेखानी घर सुदुंबर्याच्या काळे घराण्यातील त्यांची आजी व भक्ती करावयाची वंशपरागत तोच धागा त्यांच्याकडे आलेला. ते भजनात स्वत:ला हरवून बसत. पोष्टाची नोकरी संभाळून पंढरीला पालखीबरोबर पायी जात. दरवर्षी न चुकता सुदुंबर्याला उत्सवाला जात उत्सवात पडेल ते काम करीत. टाळमृंदगाच्या गजरात स्वत:ला विसरून जात. नित्यनेंम हा ठरलेला आपल्याला जी शक्य आहे ती आर्थिक देणगी देऊन पुन्हा आपल्या दोनवेळच्या भाकरीपायी दारोदारी पत्र वाटपाचे काम करीत असत.