तेली समाजातील महान विभुती (भाग 8) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
संताजी महाराजांना तेली समाजाने आपले दैवत म्हणून स्विकारले आहे. तुकाराम महाराजांच्या 14 टाळकर्यांपैकी सर्वात महत्वाचे शिष्य असा त्यांचा लौकिक आहे. ते तुकारामांसोबत कायम सावली सारखे असत. संताजी जगनाडयांमुळेच तुकाराम लोकांना कळले. म्हणुनच म्हणता, होता संताजी सखा म्हणून वाचली गाथा आणि कळला तुका.
याशिवाय हिमाचल राज्यातल्या माता राजीम या फार मोठ्या संत, साईबाबांसोबत सावलीसारखे असणारे म्हाळसापती असे अनेक लोकोत्तर संत तेली समाजाने दिले आहेत. अध्यात्माच्या क्षेत्रातही तेली समाज तसूभरही सुद्धा मागे नाही ही गोष्ट अधोरोखित करण्यासाठी काही मोजक्या महात्म्यांची धावती ओळख करून दिली आहे