श्रीरामपूर तेली समाज - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. ८ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालयांनी जयंती साजरी झाल्यानंतर संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा कार्यालयात दर्शनी भागात लावावी, अशी मागणी पत्रकाद्वारे श्रीसाई संताजी प्रतिष्ठान शिडी, अहमदनगर यांनी केली आहे. संबंधित कार्यालयाला श्री संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने परिपत्रकानुसार राष्ट्रीय संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे पत्रकात नमूद केले आहे. त्यानुसार दि.८ रोजी संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करुन संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा कार्यालयात दर्शनी भागात लावावी, अशी मागणी उत्तर नगर जिल्हयातील साई संताजी प्रतिष्ठान वधु-वर पालक परिचय मेळावा २०१९ चे पदाधिकारी यांनी प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, शहर तालुका पोलीस स्टेशन, नगरपरिषद यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, ८ रोजी सकाळी ९ वा. नॉर्दन पेंच येथील हनुमान मंदिरात सर्व समाज बांधवांनी संत श्री जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित राहवे, असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष अॅड. अनिल काळे, उपजिल्हाध्यक्ष भागवत लुटे, सचिव रवींद्र वर्षे, अध्यक्षा विद्याताई करें, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, वनदेव सोनवणे, अनंतकुमार नागले, बाळासाहेब रोकडे, अमोल लोखंडे, शुभम चोथे, संतोष राऊत, सोमनाथ आढाव, प्रल्हाद साळुके, श्रीकांत साळुके, काशिनाथ वाडेकर, सुभाष दळवी, शिवाजी कोते, रामदास गायकवाड, विजय साळुके, प्रकाश काळे, निलेश नागले, कैलास बनसोडे, अनिल जाधव, गोकुळ नागले, सोमनाथ वर्षे, यमाजी नागले, रविंद्र जगताप, सुरेश शेजुळ, राजेंद चोथे, शिवनाथ महापुरे, भाऊसाहेब कवाडे, अनिल दळवी, नंदकुमार कटके, गंगाधर दांगट यांनी केले आहे.