कारंजा तेली समाज, दि. ७ सर्व शासकीय कार्यालयात संत संंताजी महाराज यांची जयंती करण्याचा शासन निर्णय नुकताच पारित झाला. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी जयंती साजरी होणार आहे. या पृष्ठभूमिवर येथील संत सेनाजी महाराज समाज बांधवांच्या वतीने ६ डिसेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालयांना संत सेनाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. कारंजा शहरातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा शहर पोलीस स्टेशन, कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन, सरकारी रुग्णालय, विद्याभारती कॉलेज, धाबेकर कॉलेज, किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालय, जे.सी.चवरे हायस्कूल, जे.डी.चवरे ज्यूनिअर कॉलेजला संताजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी विजयराव गुलवाडे, सुनील गुल्हाने, डॉ. राजीव गुल्हाने, किरण क्षार, सुरेश गडवाले, नितीन गडवाले, संदिप गुल्हाने, शिक्षक सुडके, गजानन गुल्हाने, बिजवे, रवी गुल्हाणे आदी उपस्थित होते.