तरुण तेली मित्रांनो जागे रहा ! रात्र वैऱ्याची आहे....
आजचा महामेळावा ही त्रिवेणी संगमाची व त्रिपुष्कर योगाची पर्वणीच आहे. समाज मेळावे, शिबीरे घेतले जातात. सदर मेळाव्याला मंत्री महोदय, उदयोगपती, आमदार, खासदार, प्रतिष्ठित, सुप्रतिष्ठित मान्यवर आणले जातात. का ? आम्हाला टॉनिक मिळावे यासाठीच.
जीवनातील २६ मूल्ये (तत्वे) मन आणि बुध्दी मिळून २८ युगांचा हा मानव देह आहे. फक्त आम्हाला ते समजत नाही. संत महंतानी कितीतरी पध्दतिने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. करीत आहेत परंतु त्याकडे आम्ही दुर्लक्ष करीत आलो आहेत.
१.जीवन जगण्यासाठी प्रसन्न मन, २. संकटाला न घाबरता सामोरे जाणे.३.चारित्र्य शुध्द ठेवणे. ४. प्रचंड आत्मविश्वास ५. कष्टावर श्रध्दा ६. टिकेकडे दुर्लक्ष ७. शब्दांचा जपून वापर करणे. ८. वेळेचे नियोजन ९. स्वत:चे दोष नष्ट करणे. १०.तणावरहित जीवन जगणे. ११. सतत सकारात्मक विचार करणे. १२. पैसा हा सर्वात श्रेष्ट नाही हे ध्यानात ठेवणे, परंतु व्यवहाराला पैश्याला किंमत देणे. १३. जिभेला गोडवा असणे. १४. निश्चित ध्येयाने वाटचाल करणे. १५. यशाची सुत्रे समजून घेणे. १६. आजच्या दिवसाला प्राधान्य देणे. १७. स्वप्ने पहावीत ती कृतीत आणणे. १८. उच्च आदर्श ठेवणे. १९. भरपूर मित्रपरिवार जोडणे. २०. जगायचं कसं याचा विचार करणे. २१.प्रभावित व्यक्तिमत्वाच्या सवई. २२. नियमित व्यायाम व योग साधना. २३. रागावर नियंत्रण ठेवणे. २४. यशस्वी सवईंचा अंगिकार करणे. २५. आपला आवडता छंद जोपासणे. २६. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधणे. इत्यादी.
आज काल इतर मागासवर्गीय जाती जमातीना मिळणाऱ्या सवलती पहाता इतर जाती सुध्दा शासनाकडे इतर मागास वर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी मोठे प्रयत्न चालू आहेत आणि जर हे यशस्वी झाले तर मग?
माननीय पंतप्रधान श्री. विश्वनाथ प्रतापसिंग, द माननीय श्री अटलबिहारी वाजपेयी सरकारने या सर्वसवलती स्वतंत्र्य भारताच्या घटनेनुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या नव्हे तर त्यानी तशा तरतुदीनमुद केल्याप्रमाणेच अमलात आणल्या हे त्रिवार सत्य आहेच असं म्हणणे वावगे होणार असं वाटत नाही.
परमपूज्य संताजी महाराज जगनाडे यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिट काढण्यासाठी २००३ च्या सदुंबरे जिल्हा पुणेच्या मेळाव्यात आवाज उठविण्यात आला होता. विद्यमान नगरविकास राज्यमंत्री नामदार राजेश टोपे यानी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे अश्वासन दिले. हेच विचार व आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी अशासकिय मागणी केली. याचा सकारात्मक विचार करुन आमदार माननीय तुकाराम बिडकर यांच्या पाठिंब्याला अनुसरुन हे टपाल तिकिट आम्हाला प्राप्त झाले आहे. शेवटी संताजींच पुण्याईच!
आता ओबीसी सधन स्थर ठरविल्यावरुन नॉन क्रिमीलेयरची उत्पन्नाची मर्यादा ४ लाखावर गेलेली आहे. हे सर्व श्रेय सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छगन रावजी भुजबळ यांना दयावे लागेल आणि यांचा पुरपुरे फायदा आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे.
जीवनात जे काही करण्याजोगं असत ते आम्ही साध्य करुया.
श्री. जयराम उर्फ बाळा महादेव आजगांवकर
अध्यक्ष, तेली समाज उत्कर्ष मंडळ, सावंतवाडी तालुका