मुंबई : तेली समाजाचा समावेश एन.टी. (National Tribe) मध्ये करावा, यासाठी बृहन्महाराष्ट्र तेली समाजाचे अध्यक्ष विलास वाव्हळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणीचे निवेदन दिलेले आहे.
गेली अनेक वर्ष तेली समाजाकडून शासनाकडे मागणी केली जात आहे. सदर मागणी हि राष्ट्रीय स्तरावर सर्व राज्यामधून केली जात आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातून देखील मागणी होत आहे.
सध्या तेली समाज हा इतर मागास वर्गात (ओ.बी.सी.) मध्ये मोडतो. परंतु खरे पाहता तेली समाज हा टोळक्याने राहून गावो गावी फिरून गावातील शेतक-यांचे शेंगदाणे, तील इत्यादींचे तेल काढून देवून भटकंती करीत असे.
त्यामुळे तेली समाजाचा भटक्या विमुक्त एन.टी. प्रवर्गात समावेश व्हावा अशी मागणी समाजाच्या वतीने केली जात आहे.
तेली समाज अध्यक्ष विलास वाव्हळ यांच्या सोबतचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.विजय पवार, सरचिटणीस दिलीप खोंड, पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.लक्ष्मण चौधरी हे या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत. तेली समाजाच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने समाजातील मान्यवरांना चर्चा करण्यासाठी ९८९२०४४८६७ या नंबर वर संपर्क करण्याचे निवेदन करण्यात आलेले आहे.