धुळे राज्य शासनाने नुकताच सरकारी-निमसरकारी कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश अध्यादेशाद्वारे नुकतेच पारित केले आहेत. तसेच श्री संताजी महाराजांची यंदा ३९५ वी जयंती साजरी होणार आहे हे औचित्य साधुन दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता राजवाडे बँकेजवळील गुरूशिष्य स्मारका जवळ गुरूपुत्र गिरीश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याचे सुभाष धर्मा जाधव यांनी काल घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
या पत्रपरिषदेला सुभाष जाधव यांच्यासह कैलास आधार चौधरी, रविंद्र चौधरी, मनोज चिलंदे, योगेंद्र केजवळील गुरुशिष्य स्मारकाजवळ होणाऱ्या महाआरतीच्या निमित्ताने रक्तदानाचा संकल्पही करण्यात आला आहे. स्मारकाजवळ महाराजांचा फलक प्रथमच शहरात लावण्यात आला आहे. महाआरती साठी श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र, दिंडोरी दरबार येथील गुरूमाऊलींचे पुत्र गिरीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महाआरतीसाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तेली पंचायतीचे अध्यक्ष भगवान करनकाळ, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रविंद्र चौधरी, कार्याध्यक्ष मनोज चिलंदे, कार्यक्रम प्रमुख वाल्मिक महाले, अमोल चौधरी, तुषार चौधरी, उमेश चौधरी, किशोर बोरसे, योगेंद्र थोरात, महेश बाविस्कर यांनी केले.