महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग व कल्याण तेली समाज,कल्याण (प.) तर्फे मा.नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार
कल्याण - तेली समाजाचे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली २०२०-२०३५ या स्वर्णिमकाळात भारत हा जगातील तिसरी महासत्ता असेल. व त्यासाठी तेली समाजाने आपल्या पाल्यांना सुशिक्षित, सुसंस्कारीत मुले घडविणे हीच काळाची गरज आहे..!-मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळेसाहेब,उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री (महा.राज्य)
बुधवार दिनांक २४ जुलै रोजी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग व कल्याण तेली समाज,कल्याण (प.) तर्फे तेली समाजाची आन, बाण, शान, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा, पारंपरिक ऊर्जा, उत्पादन शुल्क व वर्धा जिल्हा पालक मंत्री मा.नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग अध्यक्ष श्री. सुनिलजी चौधरी, व कल्याण तेली समाज अध्यक्ष श्री. सतिशजी चौधरी, यांनी आयोजित केला होता..
सदर कार्यक्रमास उर्जामंत्री मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळेसाहेब,मागासवर्गिय आयोग महा.राज्याचे सदस्य व महा.प्रांतिक तैलीक महासभेचे महासचिव डाॅ.भूषणजी कर्डिले,कल्याणचे आमदार श्री नरेंद्रजी पवार,बदलापूरचे मा.उपनगराध्यक्ष व प्रांतिक उपा.श्री शरदजी तेली,महा.प्रांतिक ठाणे विभागाचे अध्यक्ष श्री सुनिल चौधरी,कल्याण तेली समाज अध्यक्ष श्री सतिश चौधरी,वीज वितरण कंपनी कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री रफीक शेखसाहेब,अधिक्षक अभि.श्री सुनिलजी काकडे इ.मान्यवर मंचावर उपस्थित होते..!
मान्यवरांनी संत श्री संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सत्कारसमारंभाने सुरूवात झाली..
प्रस्तावना करतांना श्री सुनिलजी चौधरी यांनी श्री बावनकुळेसाहेब,कल्याण तेली समाज,महा.प्रांतिक बाबत सविस्तर माहिती देतांना वीजकंपनीतील प्रगतीबाबत व समाजाबद्दल साहेबांचा असलेला जिव्हाळा हे सउदाहरण सभागह्रापुढे कथन केले..
डाॅ.भूषणजी कर्डिलेसाहेब यांनी साहेबांबाबत त्यांच्यात असलेली प्रचंड क्षमता,उर्जा व समाजासाठी केलेले कार्य याचा विशेष उल्लेख केला तसेच दोनतीनच दिवसात सुनिलजींनी अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला. त्यांना श्री सतिशजी चौधरी,श्री मुकूंदजी चौधरी व सर्व कार्यकारीणीने उत्तम सहकार्य केले व सुनिलजींकडे असलेल्या संघटन कौशल्याबाबत गौरवोद्गार काढले.
आमदार श्री नरेंद्रजी पवार यांनी देखील आपल्या भाषणात श्री बावनकुळेसाहेब हे माझे राजकारणातील गुरू आहेत तसेच श्री सुनिलजी हे फक्त तेली समाजाचेच नेते नसून ते माझे चांगले मित्र आहेत.त्यांनी तीस वर्ष भाजपासाठी कार्य केले असून श्री मंगेश गायकर यांचेसह अनेक नगरसेवक व मलाही निवडून आणण्यात मदत केली आहे.आजही ते भाजपचे कार्य करीत आहेत.कल्याण तेली समाजास कोणतीही मदत लागल्यास मी सदैव आपल्यासोबत असेन असेही आश्वासन दिले..
मा.मंत्री महोदय यांनी आपल्या भाषणात श्री सुनिल चौधरी हे साडेचार वर्षापासून कल्याण तेली समाजाला भेट द्या याकरीता आग्रही होते पण कधी त्यांना तर कधी मला अडचणी आल्यामुळे भेट होत नव्हती तो योग आज त्यांनी घडवून आणला.आपणांस भेटून मला खरंच आनंद झाला.आज जरी वेळ कमी दिला असेल तरी पुढील वेळी पाहूणचार घेऊनच मी जाईल असे कृतज्ञता व्यक्त करणारे उदगार काढले..
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी जे तेली समाजाचे आहेत) यांनी भारत ही जगातली तिसरी महासत्ता होणार असून २०२० ते २०३५ हा भारताच्या उन्नतीचा स्वर्णिमकाळ असणार आहे त्याकरीता आपल्या समाजातील प्रत्येक पालकांनी आपापल्या मुलांना उच्चशिक्षण,सुशिक्षितता व सुसंकार देणे काळाची गरज आहे तरी सर्व समाजबंधू आणी भगिनिनी मुलांकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन केले.समाजातील कोणालाही माझी गरज भासली तर आपण सरळ माझ्याशी संपर्क साधा असे म्हणतांना त्यांनी स्वत:चा मोबाईल नंबरही दिला..
अभिमानाची बाब म्हणजे साहेब कॅबिनेट मंत्री असून देखील एखाद्या सर्वसामान्य प्रवाश्यासारखे कल्याणहून लोकल,मेट्रोने विमानतळावर गेले.त्यांच्यातील हाच साधेपणा जनतेला भावून गेला,त्यामुळे त्यांनी फक्त कल्याणकरांचीच नाही तर मुंबईकरांची देखील मने जिंकली..!
सदर कार्यक्रमास मा.अध्यक्ष मुकूंदजी चौधरी,श्री. शरदजी तेली,मा. उपनगराध्यक्ष बदलापूर,पालघर तेली समाज अध्यक्ष भगवानजी बोरसे व पदाधिकारी, ठाणे विभाग महिला अध्यक्षा पुष्पाताई बोरसे,उषाताई पवार,सिमाताई व त्यांची संपूर्ण महिला कार्यकारिणी,कल्याण महिला अध्यक्षा भाजपा पुष्पाताई रत्नपारखी व त्यांची संपूर्ण टिम,निम्न प्रांतिक पदाधिकारी, ठाणे जिल्हा साहू अध्यक्ष श्री. मनोज बाबुराम गुप्ता,कल्याण पूर्व सुर्यवंशी गुरूजी,गोविंद चौधरी,अध्यक्ष बबनजी काळे,श्री. दिपकजी काळे,ठाणे संताजी सहाय्यक संघ संदिपजी तेली,तेथील पदाधिकारी, मुंबई विभाग पदाधिकारी,सुनिल चौधरी डोंबिवली पदाधिकारी,सुरेशजी जाधव,भरत चौधरी अंबरनाथ पदाधिकारी,संतोषजी रहाटे,प्रफुल्ल खानविलकर व पदाधिकारी,गणेश महाडिक,भालचंद्र रहाटे व पदाधिकारी,साहू समाजाचे साहेबलालजी,निरजजी व अनेक पदाधिकारी,किरण तेली बाथ्री तेली समाज व पदाधिकारी,उत्तर महाराष्ट्र खांदेश विकास मंच श्री. प्रकाशजी पाटील, डोंबिवली साहू तेली समाज तर्फे श्री श्री संजीव गुप्ता जी श्री साहेबलाल गुप्ता जी श्री शिवलाल साहू .उल्हासनगर श्री अखिलेश जी 'शरेज गुप्ता व कार्यकारिणी,दिनेशजी गुप्ता, शहापूर तर्फे विनोदजी कदम व शैलेंद्र राऊत,कल्याण तेली समाज पदाधिकारी श्री. राजेंद्र चौधरी, सौ.अरूणा चौधरी,श्री. चौधरी,श्री.अरूण ढगे, श्री. सुभाष चौधरी,श्री. पी.आय. देशमुख,श्री. शशिकांत चौधरी,श्री. रमेश गायकवाड, श्री.व सौ चिंधा चौधरी व सर्व सदस्य श्री. प्रविण चौधरी व भूषण चौधरी व इतर समाज बांधव यांनी बहूमोल सहकार्य केले..!
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योगपती श्री मंगेशजी गायकर, भाजपा महासचिव श्री अमितजी धाक्रस व त्यांचे सहकारी, वीजकंपनीचे कार्य.अभि. श्री राठोडसा.श्री मेश्रामसा. श्री यादवसा. तसेच अनेक प्रांतिक सदस्यांनी अनमोल सहकार्य केले..!
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री एकनाथ चौधरी यांनी केले..!
सदर कार्यक्रम तयारीस फक्त दोन-चारच दिवसांची वेळ,प्रचंड पाऊस,लोकल ट्रेन विस्कळित,कामाचा वार (working day),दुपारनंतरची आॅड वेळ, तरीही साहेबांवरील प्रेमापोटी ३०० च्यावर समाजबांधवांची व सर्व प्रमुख पाहूण्यांची उपस्थिती होती..!