अंध विकास संस्थेस धान्यासह गणवेश द्यावा : श्रीविठ्ठल मंदिर समितीकडे मागणी
पंढरपूर - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून येथील अंध विकास संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी धान्य व गणवेश मिळावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून मंदिर समितीला देण्यात आले.
तेली समाज महासभेचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी नुकतेच या मागणीसंबंधीचे निवेदन मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना दिले. यावेळी कार्याध्यक्ष सागर पडगळ, उपाध्यक्ष बालाजी देशमाने आण्णा सलगर उपस्थित होते. पंढरपूर येथील शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेत निवासी ५५ मुले व मुली आहेत. या विद्यार्थ्यांना मंदिर समितीमार्फत प्रति महिना २०० किलो गहु, १५० किलो तांदुळ व वर्षातून दोनवेळा गणवेश पुरविण्यात यावेत अशी मागणी केली आहे.