नांदेड प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नांदेड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सत्कार सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील कुसुम सभागृहात करण्यात आले आहे.
यासाठी १० वी, १२ वी (किमान ६० टक्के गुण) तसेच, एमएचटी-सीईटी-नीट व समतुल्य परीक्षेत किमान ६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तसेच ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम श्रेणीत आलेल्या व व्यवसाय प्रशिक्षण, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर कोर्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच चालू वर्षातील सेवानिवृत्त शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, पदोन्नती मिळालेले कर्मचारी, अधिकारी, नव्याने नियुक्त झालेले कर्मचारी, अधिकारी यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी समाजबांधवांनी ७ ऑगस्टपर्यंत गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत लक्ष्मणराव क्षीरसागर, द्वारा गीता एजन्सी, २१२, सन्मान टॉवर, वजिराबाद येथे आणून द्यावी, असे आवाहन केले आहे.