वरवेली - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष रामदास तडस, महासचिव भूषण कर्डिले, गजानन शेलार यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई विभाग अध्यक्ष विलास त्रिंबककर यांच्या आदेशाने तरूण, तडफदार व सामाजिक कार्यकर्ते प्रविण विजय रहाटे (गुहागर) यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई युवाध्यक्षपदी निवड झाली.
प्रविण रहाटे हे तेली समाजोन्नती संघ चिपळूण, गुहागर या संघाचे उपाध्यक्षपदी उत्तमरित्या काम पाहत आहेत. तसेच रत्नागिरी या युवकांच्या संघात सल्लागार म्हणून काम करीत असताना तरुणांसाठी अनेक कार्यक्रम राबविले आहेत. त्यांच्या सामाजिक प्रवासात सुनिल चौधरी, सतिश वैरागी, रोहिणी महाडिक यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade