( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
इंदोरीची काही मंडळी चाकणच्या दिंडीत जात. राऊत रजा काढून त्या दिंडीत सामील होत असत. डोक्यात एकच विचार. अशीच पालखी सुरू करावयाची. या दिंडीचे जे संस्थापक होते, त्यांना हे भेटत. ही दिंडी कशी सुरू झाली, सुरू करताना काय काय केले. आलेल्या अडचनीवर मात कशी केली याबाबत चर्चा करीत असत. श्री. संताजी पवार हे सुद्धा या बाबत मार्गदर्शन करीत असत. या सर्व लोकांनी एक वेळ विचारले. तुम्ही हे जे सतत विचारत आहात. ते कशासाठी ? यावेळी राऊतांनी आपले मत स्पष्ट केले. संतांजींची पालखी निघाली पाहिजे. त्यासाठी जरूर प्रयत्न करा. यश येईल. माऊलीच्या मुक्काम ज्या ज्या तळावर असेल तेव्हा ते वेळ काढून अनेक दिंड्यात जाऊन त्यांच्या प्रमुखांना भेटत ज्यांचा उल्लेख करावा अशा दिंड्या ह्या की, चांगा वटेश्वर, सोपान काका महाराज, चौरंगी महाराज या व इतर पालख्यांच्या नेते मंडळींनी मार्गदर्शन केले.