भाजपच्या बॅनर व पत्रिकांवर खा. रामदास तडस यांना स्थान नाही. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने नोंदविला निषेध
अमरावती : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भाजपतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बॅनर ब पत्रिकांवर भाजपचे वर्धा खासदार रामदास तडस यांना स्थान देण्यात आले नसून हा त्यांचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया तेली समाज बांधवांमध्ये उमटत आहे. या सर्व प्रकाराचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने निषेध केला असून आगामी निवडणुकीत याचा आम्हाला विचार करावा लागेल असा इशाराही दिला आहे.
खा. रामदास तडस हे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष असून राज्यातील तेली समाजाचे ते प्रतिनिधित्व - करीत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते मोठया मतांनी विजयी झाले असून त्यांच्या रुपाने तेली समाजाचा एक प्रतिनिधी संसदेत पोहोचला आहे. असे असताना देखील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या बैनर, पोस्टर व पत्रिकांवर खा.तडस यांना स्थान देण्यात आलेले नाही. पक्षातील काही संधीसाधु नेत्यांनी सोईस्करपणे खा. तडस यांना डावलण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेने केला असून बैनर व पत्रिकांवर खा. तडस यांना स्थान न देणे म्हणजे त्यांचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया तेली समाजात उमदत आहे. पक्षासाठी अविरतपणे कार्य करणान्या खा. तडस यांचा अशा पध्दतीने जाहीर अपमान होत असेल तर त्यांचे कार्यकर्ते म्हणून आणि तेली समाज बांधव म्हणून आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत विचार करावा लागेल असा इशारा तेली समाज बांधवांनी दिला असून वरील सर्व प्रकाराचा निषेध महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी डॉ. संजय शिरभाते, संजय हिंगासपूरे, प्रतिक पिंपळे, सागर शिरभाते, विजय शिरभाते, किरण गुलवाडे, चंदू जावरे, राजू हजारे, अमोल आगासे, सरोज गुल्हाने, वैभव बिजये, विशाल गोधनकर, दिपक गिरुळकर, प्रकश जिरापुरे, विजय डोले, कुणाल बिजबे, निकिता उमक, आकाश राजगुरे, अंबादास हिंगासपूरे, मनोहरराब गुल्हाने, सुनील चोकडे, पवन बिजवे, राजा बांगडे, दिनेश फणसे, संजय दोले, प्रवीण भस्मे, शंकरराव नाचनकर, राजेश आगरकर, दिलीप बारडे, संतोष साहू, दिपक साहू, सम्राट साहू, सुनील साहू, मिना आगाशे यांनी केला आहे.