श्रोते झाले मंत्र मुग्ध
श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे (रजि.) श्री.संताजी भगिनी मंच ठाणे, श्री संताजी युवा मंच ठाणे आणि तेली समाजातील शासकीय अधिकारी ठाणे वर्गाच्या सहकार्याने शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले व्याख्याते डॉ. प्रदिप आठवले - मानसतज्ञ, डॉ. महेंद्रजी गुप्ता - करिअर आणि आधुनिक तंत्रज्ञान, प्रा. श्री. दिनेश गुप्ता - मोटिव्हेशन या विषयांवर अप्रतिम व्याखाने दिली. श्रोत्यांचा उत्साह, टाळ्यांनी दिलेली साथ ही कार्यक्रमाच्यायशाची पावती होती.
कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ समाजसेवक श्री गबाजी भाऊराव तेली यांच्या हस्ते सरस्वती व श्री संताजी महाराज पूजन आणि त्यांच्या स्तवनाने झाली. संस्था सचिव श्री. एकनाथ तेली सर यांनी मोजक्या शब्दांत प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. कार्यक्रम प्रसंगी इ. १० व १२ वी प्रथम 3/3 विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर समाजाला नाव लौकिक मिळवून देणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त सहा. पोलीस आयुक्त श्री. शांताराम अवसरे, श्री.शेखर बागडे यांचा महासंचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल, श्री दिलीपजी खोंड शासनाचा गुणवन्त कामगार पुरस्कार प्राप्त म्हणून, कु. पुर्वा किर्वे हिचा राष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिक स्पर्धेत पदके मिळविल्याबद्दल, श्री. सुनील कर्पे यांचा पोलीस महासंचालक पदक प्राप्त म्हणून, डाँ. श्री. सतीश वैरागी समाज सुधारक तर Adv. श्री. विशाल लांजेकर या 'प्रतिभावंताना ही सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात संस्था अध्यक्ष श्री. संदीप गबाजी तेली, सचिव श्री. एकनाथ तेली सर, उपाध्यक्ष श्री. गजानन शिंदे व विलास घोंगते, खजिनदार श्री. राजेंद्र ढवळे, उपसचिव श्री. हेमंत राऊत, तसेच श्री.रघुनाथ चौधरी, श्री. राम जाधव, श्री. मनोहर चौधरी, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांनी, तसेच भगिनी मंचाच्या सौ. सीमा चौधरी, सौ. सविता चौधरी, सौ. स्मिता चिलेकर, आणि युवा मंचाचे श्री. अश्विन चौधरी, श्री.देवेंद्र बनसोडे, श्री. अमित खेत्री व शासकीय अधिकारी वर्गाने मेहनत घेतली.