मुंबई :- महाराष्ट्र शासनाने नुकतेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर केले आहेत यामध्ये बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खोंड यांना शासनाने यावर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला आहे.
श्री दिलीप खोंड हे सध्या तळोजा येथील व्ही व्ही एफ लिमिटेड या कंपनीमध्ये युटिलिटी ऑपरेटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विविध संघटनांशी संबंध असून ते कंपनीच्या एम्पलोयी सोसायटीचे माजी संचालक असून त्यांनी सदर कंपनीच्या युनियनचे माजी सहसचिव म्हणून कार्यभार केला आहे. श्री खोंड यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत पंचवीस वेळा रक्तदान केले आहे समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना ते नेहमी मदत करतात. गुढी पाडवा नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन मध्ये त्यांचा सहभाग असतो.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade