यवतमाळ खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभेचे कामकाज वेगाने संपूर्ण विदर्भात सुरू करण्यात आले असून नुकतीच यवतमाळ जिल्हा आघाडी स्वतः रामदास सदस्यांनी गठित केली असून जिल्हा अध्यक्ष पदावर दिलीप बारडे यांची नियुक्ती केली आहे. बारडे त्यांनी अन्य कार्यकारणी घोषित केली. त्यात कार्याध्यक्ष संतोष दशरथ डोमाळे, सचिव विजय बिजुलकर, कोषाध्यक्ष रमेश जयसिंगपूरे, उपाध्यक्ष संजय रामखिलावन साहू, उपाध्यक्ष सुभाष नीत, उपाध्यक्ष राजेश गुल्हाणे, उपाध्यक्ष विलासराव गिरोलकर, उपाध्यक्ष विजयराव होळकर, जिल्हा संघटन प्रमुख राजेश्वर जी झाडे, संघटन प्रमुख साहेबराव साखरकर, संघटन प्रमुख सुरेश राव जयसिंगपुरे, संघटन प्रमुख प्रकाश राव पुंडे, महासचिव डॉक्टर रामभाऊ डेहनकर, सहसचिव किशोरराव गुल्हाणे, सहसचिव मुर्कीदराव पोलादे, सहसचिव राजेंद्र पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख सुरेशराव गांजरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पद्माकर मलेापूरे अशी ही कार्यकारिणी निवडण्यात आली असून समाजोपयोगी विविध कार्यक्रम लवकरच आयोजित केले जातील.
कार्यकारिणी सदस्य म्हणून पांडुरंग गुल्हाणे, योगेश माकडे, प्रकाश टाके, दिगांबर चिंचोरे, केदार शिरे, डॉ. सुधाकर डेहणकर, पुरुषोत्तम पावडे, ज्ञानेश्वर मुडे, प्रमोद अजमिरे, रमेश गिरोलकर, बाळासाहेब रुईकर, देवराव किनकर, यांचा समावेश आहे. लवकरच महिला आघाडी सौ सुमन ताई साहेबराव साखरकर यांच्या नेतृत्वात तयार केली जाणार आहे. आघाडीच्या अध्यक्षपदी सुरेशराव झोपाटे हे असून युवा आघाडीच्या अध्यक्षपदी चेतन वसंतराव भुराणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राळेगाव तालुका अध्यक्ष म्हणून निलेश राव गुजरकर, कळंब तालुका अध्यक्ष म्हणून प्रशांत डेहनकर यांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यकारणीचे समाज बांधवांनी स्वागत केली आहे. लवकरच इतर तालुका अध्यक्षांची निवड करण्यात येईल.