औरंगाबाद काही दिवसांपूर्वी काचीवाडा येथील तेली समाज भगिनीला मुस्लिम समाजाच्या गुंड प्रवृत्तीच्या युवकाने शिवीगाळ करून धक्का बुक्की केली होती व त्यांच्या मुलालाही मार लागला होता.सदरील घटना समजताच तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व सुनिल क्षीरसागर यांनी सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दादासाहेब शिंनगारे यांना भेटुन आरोपीला लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली होती जेणे करून अशी हिंमत या पुढे कोणीही करणार नाही.तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.अनिलभैय्या मकरिये यांनी पोलीस निरीक्षकांना फोन करून आरोपीला लवकर अटक करून कडक कारवाई करावी अशी सुचना केली होती,सदरील तेली समाज भगिनीला औषध उपचार करीता घाटी दाखल करण्यात आले.होते त्यांच्यावर उपचार सुरु होते.औरंगाबाद शहरात मध्ये दिवसां दिवस होत असलेल्या महिलांवरील अत्याचारा विरोधात आदरणीय अनिलभैय्या मकरिये यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना भेटुन निवेदन देण्यात येणार आहे.सदरील घटनेत तेली समाज बांधव अनिल क्षीरसागर यांनी घाटीत मेडिकलसाठी सहकार्य केले होते. तेली समाज अंर्तगत 11 युवकांची आक्रमक टिम तयार करण्यात येणार आहे भविष्यात जर अशी घटना घडल्यास ही टिम लगेच घटना स्थळी जाऊन मदत करील.आज गणेश पवार, सुनिल क्षीरसागर, अनिल क्षीरसागर यांनी पिडीतेच्या निवासस्थानी जाऊन तब्यतीची विचारपूस केली