कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.
कणकवली येथील वृंदावन हॉलमध्ये मंडळाचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास वेदमूर्ती प्रा. महादेव सातार्डेकर, माजी अध्यक्ष आबा तेली, मधुकर बोर्डवेकर, आपा तोडकेकर, प्रकाश काळसेकर, मंगेश शेर्लेकर, तुकाराम तेली, लक्ष्मण तेली आदी उपस्थित होते. प्रा. महादेव सातार्डेकर यांनी केलेल्या मंत्रघोषात उद्घाटन पार पडले. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या समाजातील विद्यार्थी दिव्या तेली, विनय तिवरेकर, क्षमा डिचोलकर, तुषार कुवळेकर, समृध्दी डिचवलकर, मृणाली तेली, उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्केवरील श्रावणी रेडकर, धनश्री हरकुळकर, शिष्यवृती धारक चिन्मय पेडणेकर, प्राजक्ता तेली यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष एकनाथ तेली यांनी जाहीर केलेले ११ हजार रु. चे बक्षीस मृणाली मंगेश तेली हिने पटकाविले. उत्तेजनार्थ ५ हजार रु. चे बक्षीस समृध्दी डिचवलकर हिला देण्यात आले. विद्यार्थ्यांच्यावतीने मृणाल तेली व समृध्दी डिचवलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
समाजबांधव सत्कारामध्ये पखवाज वादक गौरव पिंगुळकर, वक्तृत्व स्पर्धा विजेता सौरभ बांदेकर, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी उपप्राचार्य सुनील नांदोस्कर, वेदमूर्ती प्रा. महादेव सातार्डेकर, निवृत्त विस्तार अधिकारी तुकाराम तेली, आपा तोडकेकर, चंद्रकांत तेली, सुरेश नेरूरकर, एकनाथ तेली, शैलेश डिचवलकर, प्रकाश काळसेकर व इतर समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी ६ मुलांना प्रत्येकी २ हजार रु. प्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली. तर कौशिक सुनील तेली यांच्या आईसाठी वैद्यकीय मदत देण्यात आली. विनय तिवरेकर याला परशुराम झगडे यांच्याकडून २ हजार ५०० रु. तर प्राची तेली हिला शैलेश डिचवलकर यांच्याकडून १ हजार रु. ची मदत करण्यात आली.
मनोगत व्यक्त करताना सुनील नांदोस्कर यांनी पालकांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या आवडीनुसार शिक्षणाचे क्षेत्र निवडावे असे सांगितले तर वेदमुर्ती प्रा. सातार्डेकर यांनी संस्कृत अभ्यासाचे महत्त्व विशद करताना आहार-विहाराविषयी मार्गदर्शन केले. समाजबांधवांनी जिल्हा कार्यालयासाठी दिलेल्या मदतीबद्दल अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भविष्यात समाजातील आर्थिक कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत तेली तर आभार परशुराम झगडे यांनी मानले.