श्री संताजी समाज विकास संस्थेचे आयोजन
२५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार उपवर-वधुंच्या नावाची नोंदणी
अमरावती : श्री संताजी समाज विकास संस्था, अमरावती व्दारा दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा विदर्भस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाचा भव्य उपवर-वधू परिचय मेळावा रविवार १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे होणार असून या मेळाव्याच्या निमित्ताने विवाह बंधन नामक पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
या परिचय मेळाव्याच्या नोंदणीला विदर्भातील विविध जिल्ह्यातील समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उपवर-वधुच्या नावाची नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून पालक आता २५ डिसेंबर पर्यंत पर्यंत आपल्या उपवर पाल्यांची नोंदणी करू शकतात. सर्व शाखीय तेली समाजाच्या ज्या पालकांना आपल्या उपवर-वधू यांची नोंदणी करावयाची असल्यास त्यांनी उपवर-वधू यांची माहिती दिलेल्या फॉर्ममध्ये भरुन संस्थेचे कायालयात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी झालेल्या सर्व उपवर-वधू यांची परिचय पुस्तिका तयार करण्यात येणार असून रविवार १५ डिसेंबर रोजी या उपवर-वधू परिचय मेळाव्यात विवाह बंधन या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्री संताजी समाज विकास संस्था, अमरावतीचे कार्यालय व्दारा डॉ.विजय अजमीरे, देसाई ड्रायव्हींग स्कुलचे बाजुला जोगळेकर प्लॉट, रुख्मिणीनगर, अमरावती येथे असून तेली समाजातील पालकांनी येथे सकाळी १० ते सायंकाळी ९ पर्यंत संपर्क साधून छापील फॉर्म घेवून जावा व संपूर्ण फॉर्म फोटोसहीत २५ नोव्हेंबर पूर्वी जमा करावा असे आवाहन श्री संताजी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इंजि. मिलिंद शिरभाते, ९४२२१५५१११, प्रा.डॉ.अनुप शिरभाते ९४२१८७४७८७, अविनाशपंत राजगुरे ९३२६९२५५३१, श्रीरामपंत सुखसोहळे ९४२३४३३७८४ यांचेसोबत संपर्क करावा, असे आवाहन संस्थेव्दारे करण्यात आले आहे.