समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती (प्रतिनिधी) : शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी जयभारत मंगलम येथे करण्यात आले. आपला समाज हाच आपला परीवार, अशी भावना ठेऊन आपल्या या पारिवारीक कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजाचे आराध्यदैवत सतांजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे सर्व संचालक मंडळद्वारे पूजन करण्यात आले. नतंर लगेच मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरीता महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सोबतच जोडीदाराच्या हास्यमय स्पर्धेला सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि लहान मुलामुलींनसाठी संगीत खुर्ची,गरभा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला व विजेते स्पर्धकाला मान्यवरांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली.उपस्थित सर्व समाज बांधवाचा परीचय व्हावा, भेटीगाठी व्हाव्या या नात्याने या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाने केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मडंळाचे अध्यक्ष चद्रकांत मेहरे यांनी केले, तसेच संचालन नितीन बाखडे व प्रा.स्वप्निल खेडकर यांनी केले ,कार्यक्रम यशस्वी ते साठी प्रा.डॉ.संजय तिरथकर ,गजानन बाखडे ,सजंय रायकर, यशवंत चतुर, दिपक व्यवहारे ,अशोक मांगलेकर , रमेश बोके, उल्हास ताकपिरे, तुषार गिरमकर ,राजू काळे , प्रकाश तिडके , चेतन सरोदे,पंकज डहाके ,पंकज माहोरे,अशोक देशकर,तसेच महिला मडंळ यांनी विशेष प्रयत्न केले.