औरंगाबादला,प्रतिनिधी, औरंगाबाद येथील तेली समाजाचे नेते अनिल मकरिये यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आज उघोग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या कडे तेली सेना,तेली समाजाच्या वतीने करण्यात आली.अतुल सावे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद मध्य मतदार संघात तेली समाजाचे 75 हजार कुटुंबे आहे. तेली मतदार लक्षणीय आहे. हा समाज नेहमी भारतीय जनता पक्षा सोबत राहत आलेला आहे. त्या मुळे तेली समाजाचे नेते तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली जावी अशी तेली सेनेची आग्रही मागणी आहे.अनिल मकरिये यांना मध्य विधानसभा मतदार संघातून उमेदवारी घा अशी मागणी असली तरी स्वतःअनिल मकरिये हे सर्व जाती धर्मात मिळसणारे नेते आहे.त्यांना सर्व जाती धर्मात मानणारा मोठा वर्ग आहे.त्यांना उमेदवारी दिल्यास ते सहज निवडून येऊ शकता अनिल मकरिये यांनी आज पर्यंत 1984 पासून पक्षाचे कार्य अत्यंत निष्ठेने केलेले आहे.पक्षाचे कार्यक्रम पक्षाची विचारधारा त्यांनी घरा घरात पोहचविली आहे.एक निष्ठावंत,एक विचारशील एक संघर्षप्रिय,एक गतीमान कार्यकर्ता म्हणून अनिल मकरिये हे औरंगाबाद शहराला परिचित आहे.व महाराष्ट्रातील सर्व भाजपाच्या प्रमुख नेत्यांशी अनिल मकरिये यांचा सलोख्याचे संबंध आहेत.गोर गरीब माणसांचे प्रशन ते समजून घेत आलेले आहेत.त्यांना उमेदवारी दिल्यास सर्वसामान्य मतदारांना व भाजपा कार्यर्त्यांना आनंदच होईल त्यांच्यात उत्साह संचारेल त्यामुळे अनिल मकरिये यांना औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी तेली सेनेची मागणी आहे.यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती निवेदन देऊन करण्यात आली आहे.या प्रसंगी गणेश पवार,सुनिल क्षीरसागर,अनिल क्षीरसागर,भगवान गायकवाड,महेंद्र महाकाळ,संतोष गायकवाड,नितीन तावडे,सौ.लक्ष्मीताई महाकाळ, आदींची उपस्थिती होती,