सांगली : तेली समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा तेली समाज महासंघातर्फे बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय तेली समाजाचे युव सदस्य विजय संकपाळ यांनी बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. समाजाच्या स्मशानभूमीपासून समाजमंदिरापर्यंत विविध प्रश्नांबाबत शासनपातळीवर सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर बावनकुळे यांनी, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अशोक संकपाळ, राजेंद्र लोखंडे, भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल शेजवळ, डॉ. सुधाकर बेंद्रे, शंकर शेजवळ, शिवलिंग दळवी, गणेश पवार उपस्थित होते. तेली समाजातर्फे विजय संकपाळ यांनी बावनकुळे यांचा पुष्पगुच्छ देऊ सत्कार केला.
समाजाचे प्रश्न सोडविणार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील विविध कामांची व समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करुन त्यांना आधार देण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यात येतील. सरकार हे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील.