सांगली - स्मशानभूमी, समाज मंदिर यासह तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा तेली समाज महासंघाच्यावतीने रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आली. तेली समाज महासंघाचे युवा सदस्य विजय संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी क्षीरसागर यांची मुंबईत भेट घेतली. त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने जिल्हा तेली समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील समाजाच्या प्रश्नांवर चचा करण्यात आली. क्षीरसागर यांनी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे विजय संकपाळ यांनी सांगितले. यावेळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अशोक संकपाळ, सतारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल शेजवळ, सुधाकर बेंद्रे, शंकर शेजवळ, शिवलिंग दळवी, सुनील विभुते, गणेश पवार उपस्थित होते. 
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade