औरंगाबाद,(संभाजीनगर) दि.6/10/2019 रोजी औरंगाबाद येथे तेली समाज गुणवंत विघार्थी सत्कार समारंभ व तेली समाज कर्तबगार पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून तेली समाजाच्या महिलांना सामाजीक कार्याची ऊर्जा दिल्या बद्दल गणेश पवार सुनिता पवार,यांचा त्यांच्या शुभ चिंतकांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.या वेळी गणेश पवार हे बोलत होते,पुढे बोलतांना ते म्हणाले की कोणत्याही चांगल्या कामाला समाज पाठबळ देत असतो. फक्त आपला मार्ग योग्य असला पाहिजे.वाटचाल योग्य असली की समाज बांधव सहकार्य करतात.व ती एक दिव्य शक्ती ही आपली मदत करीत असती जीला आपण देव म्हणतो.जो कोणी सत्याच्या मार्गवर चालतो त्याचे संरक्षण ती दिव्य शक्ती करते म्हणजे चांगल्या कामात देव सुद्धा तुमच्या सोबत असतो.कोण काय बोलतो याच्या कडे लक्ष न देता आपल्याला जे चांगलं वाटते तेच आपण करायला हवे टिका करणारे करतात बोलणारे बोलत असतात मुळात टिका टिप्पणी कणा-यांची जडण घडण तशीच झालेली असते.देवांने त्यांना तसेच घडवलं आहे. मुळ स्वभावच त्यांचा तसाच असतो,ते टिकाकर पण आपलेच समाज बांधव आहे.आपलं काम असते त्यांनाही संभाळून घेणे.माणूस छोटा असो की मोठा गरज सर्वांना पडती पण त्याचे गंभीर्य ओळखून मदत करायची असते,त्या वेळी आपण कोणाला केलेली मदत ही आमूल्य असते त्याची किंमत होऊ शकत नाही.नागपूर येथे आयोजीत कार्यक्रमात गणेश पवार यांनी उदाहरण देऊन आपली भूमिका स्पष्ट केली,चांगले कार्य करत राहावे देव,समाज तुमच्या पाठीशी असतो,आपले प्रेम आशिर्वाद ही माझी शक्ती आहे.त्या मुळे मी कधीही पराजीत होऊ शकत नाही.असे गणेश पवार म्हणाले,तेली समाज बांधव सागर पाडसवान यांच्या निवास्सथानी महेंद्र महाकळ,सौ.लक्ष्मीताई महाकाळ सागर पाडसवाण,योगेश मिसाळ,यांच्या पुढाकारातून सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,भारतीय जनता पार्टिचे प्रदेश कार्यकरणी सदस्य अनिलभैय्या मकरिये,तेली समाजाचे जेष्ठ नेते,विश्वनाथ गवळी (मामा) कूष्णा ठोंबरे,(आण्णा) गणेश वाडेकर,विनोद कसबेकर,महेंद्र महाकाळ,योगेश मिसाळ,सागर पाडसवान,अशोक पाखरे,शिवा महाले,ईश्वर पेंढारे,अक्षय पाडसवान,विशाल नांदरकर,संतोष सुरूळे,प्रकाश सोनवणे,योगेश थोरात,अजिंकय पाडसवान,अरुण सोनवणे,अनिल करपे,कूष्णा पेंढारे,लक्ष्मीताई महाकाळ,नम्रताताई देवे,अंजलीताई मिसाळ,गायत्रीताई क्षीरसागर,छायाताई सोनवणे,कोमलताई पाडसवान,कल्पना पाडसवान,आदिंनी गणेश पवार व सुनिता पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.गवळी मामा,महाकाळ सर,महाले,पाखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुढील सामाजीक कार्यक्रमाची चर्चा केली.तसेच तेली समाज बांधवांना वेळो वेळी मदत करणारे समाज बांधव श्री.प्रकाश सोनवणे यांचाही उपस्थितांनी सत्कार केला,खेळी मेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.तसेच लक्ष्मीताई महेंद्र महाकाळ यांच्या पुढाकरातून 2018 रोजी औरंगाबाद येथे गणेश मंगल कार्यालयात तेली शक्ती उत्सव समितीची स्थापना करण्यात येऊन नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला होता.दुर्गामेतेची मानाची साडी आज लक्ष्मीताईनी सुनिता पवार यांना देऊन सन्मान केला.