दि.6/10/2019 रोजी तेली सेनेच्या वतीने औरंगाबाद येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.आपले तेली समाज बांधव श्री.गणेश शिंदे,व सौ.अल्काताई शिंदे यांनी सकल तेली समाज नारी शक्ती नवरात्र उत्सव समिती स्थापन करून दर्गामातेची प्राणप्रतिष्ठा केली होती,त्या दिवशी अष्टमीची पूजा असल्या मुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकल्या नव्हत्या त्यामुळे आज कु. साक्षी गणेश शिंदे हिला तेली समाजाचे जेष्ठ नेते विश्वनाथ गवळी (मामा) यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी तेली समाजाचे विभागीय अध्यक्ष कचरू वेळंजकर, अशोक पाखरे, सुनिल लोखंडे, गणेश शिंदे, राजेश शिंदे, संताराम वाळके, योगेश मिसाळ, दत्ता शिंदे, मगर साहेब, संतोष वाळके, विनोद मिसाळ, कूष्णा पेंढारे, योगेश थोरात, वाळके, सुनिल क्षीरसागर, तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, काकू, रंजनाताई वेळंजकर, अंजलीताई मिसाळ,नम्रताताई देवे, डॉ. दिपालीताई वाळके, धनश्री दारूणकर, सुनिता पवार, अल्काताई शिंदे आदींची उपस्थिती होती.