दि १७-११-२०१९ रोजी. बृहन्महाराष्ट्र तेली समाजाच्या वतीने महाराष्ट्र महिला अध्यक्षा राजश्री भगत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा आणी शहर महिलांची मीटिंग आयोजित केल्या गेली . जिल्हा महिला अध्यक्षा सौ मंगल जाधव, उपाध्यक्षा मंगल धोमकर, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा पुरूष अध्यक्ष डॉ. चौधरी साहेब पुणे अध्यक्ष श्री रवींद्र शिंदे, महाराष्ट्र संघटक श्री मुर्कुडे, पुणे शहर सचिव श्री गणेश पिंगळे उपस्थित होते. पुणे शहर महिला कार्यकारिणी तयार करण्यात आली.शहर अध्यक्ष आशाताई ठोंबरे, उपाध्यक्षा वंदना चव्हाण, सचिव कमल सुपेकर सहसेक्रेतरी ललिता मांजरेकर, खजिनदार वसुधा थोरात, सहखजिंदार उषा केदारी या प्रमाणे महिला कमिटी तयार झाली.सर्वांचे उत्तम मारगदर्शन मिळाले. राजश्री भगत यांनी एन्. टी. प्रवेशाबाबत सूतोवाच केले.आणि जानेवारी मध्ये अखिल महाराष्ट्र तेली समाजाच्या विकासासाठी पुणे तेथे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सांगितले. बी.एम.टी.एस.चे प्रमुख तथा अध्यक्ष श्री विलास व्हlवळ साहेब मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेणार असल्याची कल्पना दिली .आणि त्याचे आतिथ्य पुणे जिल्हा करणार आहे.या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली