( टीप :- श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ हा इतिहास श्री. धोंडिबा राऊत यांनी मला सांगितला तसा शब्दांकन केला. याचा पडताळा पाहण्यास वेळ अपुरा होता. या बाबत शंका असतील तर त्या पालखी मंडळांशी संपर्क साधून निरसन कराव्यात. सन १९८९ ) :- श्री. मोहन दत्तात्रय देशमाने
दुसरा दिवस रविवारचा हेता. सकाळी लवकर उठण्याचा प्रश्नच नव्हता तोच नऊ साडे नऊला राऊतांच्या सौभाग्यवतींनी त्यांना जागे केले. अंबाचंद शेठ यांच्याकडे पुण्यावरून फोन आला आहे.
‘‘ कुणाचा फोन ?‘‘
‘‘ नाव सांगितले नाही.‘‘
ते फोन घेण्यास गेले फोन उचलला
‘‘ आपण राऊतच का ?‘‘
‘‘ हो.‘‘
‘‘ मी रत्नाकर भगत बोलतोय. हे बघा रात्री जो प्रकार घडला तो घडावयास नको होता. पण समाजाच्या विचाराला अनुसरून मला थांबावे लागले. आपण गेल्यानंतर रात्रभर मला या गोष्टीने चैन पडले नाही. यावर साधकबाधक विचार केला. रात्री मीही हिरिरीने बोलणे गरजेचे होते. याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. रात्री आपण म्हणता त्या मार्गाने पालखी काढू. त्यासाठी कडक होण्याची तयारी आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. ‘‘दादा
‘‘या मी घरी आहे.‘‘ राऊत