संत संताजी जगनाडे महाराज जयंती, चामोर्शी 2019

        संताजी स्नेही मंडळ, तालुका चामोर्शी  चे वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती, निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम, दिनांक 0८ डिसेंबर २०१९ (रविवार) दुपारी १.०० वाजता,  स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी, अध्यक्ष - मान. प्रा. विलास निंबोरकर, गडचिरोली,  प्रमुख वक्ते   मान. प्रविनदादा देशमुख, सुप्रसिद्ध वक्ते, यवतमाळ (विषय : शेतीचे अर्थकारण, सरकारी धोरण व ओबीसी आरक्षण),  किर्तनकार मान. इंजि. भाऊसाहेब थुटे , प्रसिद्ध प्रबोधनकार तथा सप्तखंजेरी वादक, वर्धा (सत्यपाल महाराज यांचे शिष्य)  

         Sant Santaji Jagnade Maharaj anniversary महाराष्ट्राला संत परंपरेचा एक मोठा इतिहास आहे. या संतानी तत्कालीन अनिष्ठ रूढी, परंपरा व अंधश्रद्धेवर फार मोठे कोरडे ओढले आणि समाजाला त्यातुन बाहेर काढुन समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रूजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.पंरतु समाजाला कायम अंद्धश्रद्धेत ठेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित वर्गाला हे खटकाणारे असल्याने त्यांनी संताचा सुद्धा फार मोठा छळ केला.

      "नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती।।" असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविणाऱ्याला संत तुकारामाच्या पोथ्या इंद्रायणीत बुडवून त्याचा खुन केला आणि ते सदेह वैकुंठाल गेले अशी कंडी पिकवली. त्यांचे शिष्य संत संताजी जगनाडे महाराजांना याचे अतिव दुःख झाले. म्हणुन त्यांनी गावोगाव फिरून संत तुकाराम महाराजांचे मुखोद्गत अंभग लिहुन काढले आणि समाजाला जागृत करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. परंतु अजुनही समाज त्या जुन्या अनिष्ठ, रूढी, परंपरा व अंधश्रद्धेच्या जोखडातुन मुक्त झालेला दिसत नाही. याउलट समाज जितका अधिक उच्च शिक्षित होत आहे, त्या प्रमाणात तो अधिक अंधश्रद्धाळु होतांना दिसत आहे.

       प्रिय बंधुजनहो,०८ डिसेंबर १६२४ हा संत जगनाडे महाराजांचा जन्मदिन आहे. त्यादृष्टीने त्यांचे परिवर्तनवादी विचार, समाजात रूजावे, जनतेत वैचारीक परिवर्तन व्हावे, असे वाटते. कारण विचारांचा प्रभाव परिवर्तनवादी असेल तर कौटूंबीक जीवन प्रगतीपथावर जाईल. विचारात घडलेला बदल सवयी बदलतो, सवयीतुन व्यक्ती घडते व समर्थ लोकशाही राष्ट्र बनवायचे असेल तर परिवर्तनासाठी महापुरूषांना अभ्यासुन व वास्तव स्विकारून पुढे जावे लागेल. म्हणुन संत जगनाडे महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम आयेजित करण्यात आलेला आहे.तरी आपण सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे, ही नम्र विनंती आयोजक : संताजी स्नेही मंडळ, तालुका चामोर्शी यांच्‍‍‍‍या वतीने करण्‍यात आलेली आहे.

दिनांक 21-11-2019 14:33:40
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in