महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नाशिक विभागीय तेली समाज युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष शामकांत जगन्नाथ ईशी यांची निवड अ.भा.तेली साहू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर यांचे आदेशानुसार युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी केली आहे.
शामकांत ईशी यांनी राज्यात सर्वप्रथम तेली समाजाची तालुकास्तरीय जनगणना करून पुस्तिका प्रकाशित केली. तीन राज्यांचा राज्यस्तरीय भव्य वधूवर पालक परिचय मेळावा तसेच तालुका व जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा असे विविध उपक्रम राबवून त्यांनी विभागात व राज्यात आदर्श निर्माण केल्यानेच त्यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. शामकांत ईशी यांच्या निवडीच जयदत्तजी क्षिरसागर, हिरालाल चौधरी, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी आमदार शिरिषदादा चौधरी,आ.कांशीराम पावरा, नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, डॉ.अरुण भस्मे, कृष्णराव हिंगणकार, विजयभाऊ चौधरी, विक्रांत चांदवडकर, सुखदेव वंजारी,साई शेलार,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,राजगोपाल भंडारी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, डॉ.रवींद्र चौधरी, राजेंद्र बागुल, युवराज करनकाळ, संदीप महाले, सतीश महाले, निरंजन करणकाळ व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade