जय संताजी ,
कै.दादातेली-हरितेली यांच्याप्रमाणेच त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन , ' व्यक्ती पेक्षा समाज श्रेष्ठ ' हे मतप्रमाण मानत सामाजिक एकोपा जोपासला जावा ह्याकरिता श्री क्षेत्र पैठण येथे संताजी युवक तेली महासंघाच्या माध्यमातून श्री. सोमनाथ बद्रीनाथ सर्जे यांच्या पुढाकाराने मागील पंधरा वर्षांपासून समाजातल्या प्रत्येक घटकांचे विकासाभिमुख ध्येय व धोरणात्मक सामाजिक हित जोपासण्याचे काम आम्ही आज वर करत आलो आहोत आणि हे करत असताना सामाजिक जाण राखत माणस एकत्र आली कि भल्याच भरीव असं काहीतरी चांगलं काम होऊ शकत याचा प्रत्यय पावलोपावली येऊ लागला आणि म्हणूनच सध्याच्या स्थितीत समाजबांधवांनी एकजूट होऊन संवादी होणं अत्यंत महत्वाचं आहे. संताजी युवक तेली महासंघ त्या अनुषंगाने काम करतंय. त्याच धर्तीवर संताजी युवक तेली महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ सर्जे यांच्या पुढाकारातुन पैठण येथील तिळवण तेली समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आजवर तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे जयंती , पुण्यतिथी महोत्सव , गणेशोत्सव , गुणवंताचे सत्कार असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचे व अश्या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होण्याचे कार्य आम्ही करत आलो आहोत. हे करत असताना समाजातील विविध संस्था , संघटना यांच्याशी संबंध येत गेला त्यापैकी बर्याच सामाजिक कार्याला प्रोत्साहन ठरतील अश्या नवनवीन प्रेरणादायी गोष्टी बघायला, शिकायला मिळाल्या तर काही ठिकाणी लाचार व्यक्तिनिष्ठ इच्छा पायी व्यक्तिपूजक लोकांचा व सारासार सामाजिक विचार गहाण ठेवलेल्या प्रवृतींचा हि सुळसुळाट झाल्याचे बघायला मिळाले यामध्ये समाज कार्य करत असताना आपल्याच समाजबांधवांकडून एखाद्या व्यक्तीचे वा त्याच्या कामाचे , विचारांचे मूल्यमापन करतांना ते एकतर उदो उदो करूनच केलेले अथवा त्याची खेटराने पूजाच केलेले असे दोनच प्रवाह आपल्याकडे उरलेत. हे सामाजिक बांधिलकीचे अधःपतन असून सामाजिक तथा वैचारिक प्रगल्भतेच्या अमीट दुष्काळाकडे नेणारं आहे. यातली विशेष धक्कादायक बाब अशी कि या भरकटलेल्या सामाजिक नौकेचे खलाशी कुणी अल्पमती नसून ते लोक आपलेच समाजबांधव आहेत जे स्वतःला समाजभूषण वगैरे बिरुदे लावून समाजात मिरवून घेतात. अशा काळात कुणी एक नाराज होईल , वा आपण विचार मांडलेच तर ते आपल्या अंगावर येतील म्ह्णून आपल्या विचारांचा गळा घोटून आत्ममग्नतेच्या कोशात कुणी राहात असेल तर काही काळानंतर खस्ताहाल झालेल्या आपल्या सामाजिक व्यवस्थेला नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार अशा व्यक्तीला अथवा कुणा समाजबांधवाना उरत नाही. कुठल्याही समाजाला लागलेली कीड म्हणजे हे ' बघे ' असतात. म्हणून बोललं पाहिजे , मांडलं पाहिजे पण त्यात अकारण आकस असता कामा नये आणि फालतूंचा तोंडपुजेपणाही असू नये असावं ते आरशासारख स्पष्ट परखड चिकित्सक विश्लेषण ! तसेच सामाजिक क्षेत्रात सामाजिक पदाधिकारी अथवा प्रतिनिधी म्हणून वावरत असताना प्रत्येकाने निसर्गाचा नियम आठवणीत ठेवावा मूठभर पेरलं कि सूपभर उगवतं , आपण काय पेरून ठेवले स्वतःसाठी कि समाजासाठी ? समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या समाजबांधवांना सोबत घेऊन एक वैचारिक नाळ जुळवून सामाजिक कार्य करत समाजातील सर्व क्षेत्राचे उत्थान होणे आणि पर्यायाने त्याकऱीताच सर्व घटकांनी एकत्रित राहणे संघटित राहणे व संवाद होणं अत्यंत महत्वाचं आहे.
जय संताजी.
आपलाच ,
प्रवीण दत्तात्रेय सर्जे
संपर्क प्रमुख , संताजी युवक तेली महासंघ , श्रीक्षेत्र पैठण
संपर्क क्रमांक : ९८६०९५५१७७