२०१८ मध्ये शासनाने जारी केलेल्या आदेशामध्ये तेली समाजाचे आराध्यदैवत भक्तश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबर रोजी जयंती सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेली आहे यासाठी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी,रत्नागिरी, माहिती संचालनाय,रत्नागिरी, जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी,मुख्याधिकारी रत्नागिरी नगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना शासनाने जाहीर केलेल्या अध्यादेशाची शासन निर्णयाची प्रत व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष मा. खा.रामदासजी तडस साहेब यांचे पत्र देण्यात आले यावेळी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष मा. रघुवीरजी शेलार,कार्याध्यक्ष मा. दिपकजी राऊत,जिल्हा परिषद रत्नागिरीचे बांधकाम व आरोग्य सभापती मा.विनोदजी झगडे साहेब, महिला संघटक सौ.शुभदाताई शेलार,महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई लांजेकर, तालुकाध्यक्षा सौ.प्रियांकाताई नाचणकर,तालुका युवा संघटना सहसचिव योगेशजी पावसकर,महिला सदस्या सौ.सुवर्णाताई पावसकर,वधू वर मंडळ साहाय्यक श्री. मनोहरजी कोतवडेकर,श्री जयसिंगजी राऊत, सौ.रसाळ,श्रीमती बसणकर आदी तेली बांधव उपस्थित होते