अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने दि.2/12/2019 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाराष्ट्र शासनाने दि.8 डिसेंबर या तारखेला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच शैक्षणिक संस्थामध्ये संताजी महाराज यांची प्रतिमा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथून सुरवात करण्यात आली. त्याप्रसंगी शिर्डी येथील मा प्रांताधिकारी साहेब,प्रांत कार्यालय, शिर्डी, मा.मुख्याधिकारी साहेब शिर्डी नगरपंचायत शिर्डी, मा.तलाठी साहेब, तलाठी कार्यालय शिर्डी, मा.मुख्याध्यापक साईनाथ माध्यमिक विद्यालय,आदर्श माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा शिर्डी याविविध ठिकाणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या कार्याचा प्रसार प्रचार व माहिती पुढील पिढीला व्हावी यासाठी दरवर्षी 8 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्यात यावी त्या अनुषंगाने शिर्डी शहर तेली समाजाच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा सदरील विविध शाळा व प्रशासकीय कार्यालयात सप्रेम भेट देण्यात आली.
यावेळी शिर्डी शहरातील जेष्ठ तेली समाजबांधव श्री दत्तात्रयशेठ जगन्नाथ लुटे ,श्री ह.भ.प.यशवंतराव वाघचौरे, श्री अॅड.विक्रांत वाघचौरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री बद्रीनाथ लोखंडे, शिर्डी शहर अध्यक्ष रवींद्र महाले , तसेच शिर्डी शहर तेली समाज बांधव धीरज व्यवहारे,विजय जंजाळ,अंजली कोते मॅडम,अशोक गाडेकर,राजेंद्र पाडसवान तसेच मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.