दि. ०८. डिसेंबर संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्ताने व 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस या औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तसेच अहमदनगर जिल्हा व शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "संतांची थोरवी" निबंध स्पर्धा व "विश्वकल्याण" क्रांतिकारक व राष्ट्रभक्ती या विषयावर वक्तृत्व / भाषण स्पर्धा आयोजित केली आहे. सदरील बक्षीस वितरण कार्यक्रम हा शिर्ङी येथील जिल्हा प्राथमिक शाळा शिर्डी येथे दि 10 डिसेंबर रोजी आयोजित केलेला आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स व शिर्डी शहर तेली समाज यांचे वतीने तीन रोख बक्षीस व प्रशस्ती पञक,विध्यार्थी गुणगौरव ट्राफी प्रथम बक्षीस ७०१/-रूपये द्वितीय बक्षीस ५०१/- रूपये तृतीय बक्षीस ३०१/- रूपयेअसे एकूण दोन गटात 12 बक्षिसे विद्यार्थीना रोख स्वरूपात बक्षीस व सन्मान विद्यार्थी गुणगौरव आणि सन्मान पञ ट्राफी देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी या 10 डिसेंबर 2019 रोजी होणाऱ्या संताजी महाराज जगनाडे यांच्या जंयती निमित्ताने समाज बांधवांनी व महिला भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती ठिकाण :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी मैदान, 10 डिसेंबर मंगळवार रोजी वेळ.सकाळी ११.३० वाजता पिपंळवाङी रोङ, शिर्ङी