देवरी : महाराष्ट्र शासनाच्या २६ डिसेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्यामध्ये ३७ महापुरुष, राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची यादी जाहीर केली आहे. यात संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोज रविवार ला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार जाहिर करण्यात आले आहे. मात्र अनेक शासकीय कार्यालयात संत जगनाडे महाराजांचे छायाचित्र नाही. त्यामुळे विदर्भ तेली समाज महासंघ शाखा देवरीच्या वतीने आज दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी संत शिरोमणी जगनाडे महाराज यांचे छायाचित्र देवरीच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाला भेट देण्यात आले. यात नगरपंचायत कार्यालय देवरी, तहसील कार्यालय देवरी, पंचायत समिती देवरी, ग्रामीण रुग्णालय देवरी, वन विभाग देवरी, खरेदीविक्री देवरी, प्रकल्प ऑफिस देवरी, पोलीस स्टेशन देवरी, मनोहर भाई पटेल सीनियर कॉलेज देवरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवी, कृपी विभाग देवरी, विद्युत विभाग देवरी, सार्वजनिक बांधकाम विभाग व छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी देवरी आदि कार्यालयाचा समावेश आहे. सोबतच महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक देण्यात आले. यावेळी विदर्भ तेली समाज महासंघाचे पदाधिकारी झामसिंगजो येरणे, राजेश चांदेवार, एड. पुष्पकुमार गंगभोईर , भैयालाल चांदेवार, नेमीचंद आंबोलकर, अनिलकुमार येरणे, पार्वताबाई चोपकर, सुनील चोपकर, बापू चांदेवार, अशोक चदिवार, विनोद गिरेपुंजे, अशोक हटवार, प्रमोद चोपकर, मनोज भूरे, वासुदेव लांजेवार, घनश्याम निखाडे, कुलदीप लांजेवार,ओम करंजेकर आदिसमाज बांधव उपस्थित होते