जगत गुरु तुकोबाराय यांचे पटशिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतनिमित्त कळंबमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबादचे खासदार श्री.ओमराजे निंबाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद- कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.कैलास घाडगे पाटील उपस्थित होते. तसेच कळंब च्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णाताई मुंडे, लिंगायत समाज महाराष्ट्र अध्यक्ष श्री राजाभाऊ आबा मुंडे, माजी नगराध्यक्ष श्री.शिवाजी आप्पा कापसे, उपनगराध्यक्ष संजयजी मुंदडा, उस्मानाबादचे तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.रवी कोरे, संताजी जगनाडे महाराज सुदुंबरे संस्थान चे जिल्हाध्यक्ष श्री गोकुळ बरकसे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. व संताजी जगनाडे महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्रावर व्याख्यान धारूर येथील शिक्षक श्री. विजय काळे सरांनी दिले. "तुकोबारायांच्या गाथा, अभंग संताजी महाराजांना मुखपाठ असल्यामुळे जगासमोर जशास तसे आणण्याचे काम त्यांनी केले" असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला उस्मानाबाद जिल्ह्यातील तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्ह्यातील तेली समाजाने परिश्रम घेतले.सूत्रसंचालन श्री. गोकुळ बरकसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.रवी कोरे यांनी केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade