पुणे तिळवण तेली समाजाच्यावतीने आज संत शिरोमणी संताजी महाराज जयंतीनिमित्त भवानीपेठ कार्यालय ते पुणे महानगरपालिका येथेपर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दुचाकी रॅलीमध्ये सर्व पुणे शहरातील समाजबांधव एकत्रित जमा झाले. रॅली रामोशीगेट, मॉर्डन चौक, नानापेठ, लक्ष्मी रोड, पवळे चौक, कुंभारवाडा, शनिवार वाडा मार्गे पुणे महानगरपालिका येथे पोहचली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे महापौर श्री मुरलीधर मोहोळ व आबा बागुल यांच्या शुभहस्ते संत संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दोन्ही मान्यवरांचा यावेळी समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुणे शहरातील कॅम्प, हडपसर, बिबवेवाडी, कोथरूड, औंध,भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थीत होते.