तिळवण तेली समाजाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेली समाज पुणे शहर अध्यक्ष घनशाम वाळुजकर, कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव सचिन नगिने, विश्वस्त प्रवीण बारमुख, पतित पावन संघटनेचे खडकवासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर, तिळवण समाजाचे प्रकाश कोकणे, हेमंत भोज, सुरेश शिंदे, अमोल शिंदे उपस्थित होते. यावेळी महापौरांना संत संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा व शासन आदेशाचे पत्र देण्यात आले. यावेळी घनश्याम वाळुजकर म्हणाले महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सन 2019 मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावे, यासाठी सत्कार व महापौरांना प्रतिमा देण्यात आली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade