उस्मानाबाद तेली समाज : संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कळंब येथे रविवारी (दि.८) जिल्हा समाज सेवाभावी संघ व उस्मानाबाद जिल्हा तेली समाज कळंब शाखेच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजनाबाबत कळंब शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस जेष्ठ मार्गदर्शक कोंडाप्पा कोरे, जिल्हाध्यक्ष रवि कोरे, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके आदींची उपस्थिती होती. या बैठकीत जयंतीनिमित्त कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी (दि. ८) सकाळी १० वाजता संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी आ. कैलास पाटील, नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष शिवजी कापसे. मार्गदर्शक कोंडाप्पा कोरे. जिल्हाध्यक्ष रवि कोरे, प्रदिप मेटे, संजय मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर शासकीय रुग्णालयात फळे वाटप, जनगाडे महारांचे चरीत्र वाचन असे विविध कार्यक्रमाचे दिवसभर होणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले आहे. बैठकीस महादेव मंगले, अर्जुन चिंचकर, सचिन देशमाने, अशोक चिंचकर, दत्ता शेवडे, बसवलिंग शेवते. गणेश शेवते. विजय देशमाने, नारायण क्षीरसागर, दादा चिंचकर,
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade