राहुरी शहर: सर्व शासकीय व निमशासकिय कार्यालयामध्ये ज्या प्रमाणे थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केली आहे. त्या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्यात यावी असे परिपत्रक शासनाने काढून त्यास मान्यता दिल्याने या वर्षापासून संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी, असे पत्र राहुरी तालुका तेली समाजाच्या वतीने तहसीलदार फसलोद्दीन शेख यांना शासनाच्या परिपत्रकाच्या प्रतीसह संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देवून देण्यात आले.
तेली समाजाच्या वतीने आज संत जनागडे महाराज यांची शासनाच्या परिपत्रका प्रमाणे ८ डिसेंबर रोजी दरवर्षी जयंती साजरी करण्याबाबत सर्व शासकीय कार्यालयास पत्र देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी या वर्षी पासून करण्यात यावी, त्याबाबत शहरातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात समाज बांधवांची बैठक होऊन त्याबाबत सर्व कार्यालयात महाराजांची प्रतिमा व शासनाचे पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेली समाजाच्या वतीने आज.तहसीलदार शेख यांची भेट घेतली.तेली समाजाच्या वतीने बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांची भेट घेऊन सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी सर्वत्र करण्याबाबत चर्चा करून बाजार समितिलाही प्रतिमा व पत्र देण्यात आले. समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष आसाराम शेजुळ, तेली समाज राहुरी तालुका अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, अहमदनगर तेली समाज जिल्हा कार्याध्यक्ष तथा शहराध्यक्ष संजय पन्हाळे, नामदेव महाराज शेजुळ, सदाशिव पवार, कैलास शेजुळ, सुरेश धोत्रे, बाळासाहेब शेजुळ, विजय करपे. श्रीकांत शेजुळ, संदीप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.