राजूर : श्री संताजी जगनाडे महाराज यांच्यामुळेच तुकाराम महाराजांची गाथा आपल्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या या कार्याची दखल केंद्र सरकारने व राज्य सरकारने घेऊन आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन एक ऐतिहासिक निर्णय झाल्याने महाराजांच्या कार्याचा गौरव झाला आहे. यापुढे तरुणपिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन राजूरचा सरपंच हेमलता पिचड यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.
यावर्षीपासून श्री संत जगनाडे महाराज जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात दि. ८ डिसेंबर रोजी साजरी होणार त्या निमित्ताने अकोले तालुका तैलिक समाजाच्या वतीने अकोले तहसील. राजर ग्रामपंचायत व राजर जिल्हा परिषद, श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळेत श्री संत संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा देण्यात आली. त्यावेळी राजूर येथील सरपंच हेमलता पिचड, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, ज्येष्ठ नागरिक नामदेव घटकर, श्रीराम पन्हाळे, ज्येष्ठ पत्रकार शांताराम काळे, माजी सरपंच संतोष लक्ष्मण बनसोडे, सदस्या वैशाली चोथवे, सारिका वालझाडे, शेखर वालझाडे, पत्रकार विनायक घाटकर, गजानन घाटकर, नंदू बाबा चोथवे, प्राचार्या मंजुषा काळे, नीलम दहीतुले, वर्षा शेलार, श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळेतील शिक्षक व समाज बांधव उपस्थित होते. सरपंच हेमलता पिचड यांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. तहसील कार्यालय, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर पोलीस ठाण्यातही पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन किरण करपे यांनी केले. आभार अशोक शिंदे यांनी मानले.