भारतीय इतिहासातला संत परंपरा फार पुरातन काळापासून ज्ञात आहे श्री वेद व्यासपासून ज्ञानेश्वर,तुकाराम,तुळशीदास, नानकदेव,सावता माळी,संतगोरा कुंभार आणि चोखामेळा या ज्ञात अज्ञात आशा अनेक संत महापुरुष आणि समाजाच्या उत्कर्षासाठी देह झिजवला. या महान संतांनी भारत वर्षात झाला समाज रचना प्राण म्हणता येईल अशी नैतिक मूल्य समाजासाठी निकोप वाढीसाठी रुजविली जोपासली व वाढीस लावली अशी नैतिकता समाजाच्या सर्वच पातळ्यांवर संतच वाढवतात. समाजाचे प्रबोधन व वैचारिक जागरण नेहमी संतांच्या माध्यमातून होत आलेले आहे.
महाराष्ट्राला संतांची फार मोठी समृद्धी अशी परंपरा लाभलेल्या आहेत या परंपरेला भूषण ठरलेले श्री संत संताजी शिरोमणी जगनाडे महाराज संत परंपरेतील थोर संत होऊन गेले संत जगनाडे महाराज संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते व ते तेली समाजाचे होते खरे तर संताना जात नसते संतांची कार्य अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी असते. जगनाडे महाराजांच्या जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात खेड जवळील संदुबरे येथे झाला. संताजी महाराजांचे वडिलांचे नाव विठोबा जगनाडे,व आईचे नाव माथाबाई असे होते ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते त्यामुळे लहानपणापासून महाराजांच्या बालमनावर धार्मिक पगडा होता त्यांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली होती श्री संताजी जगनाडे महाराजांचे शिक्षण लिहता वाचता येणे व हिशोब करता येणे एवढेच मर्यादित होते त्यांचे अक्षर अतिशय सुंदर व वळणदार होते महाराजां वर आई-वडिलांच्या धार्मिक संस्कार यामुळे येथे भजन-कीर्तन जात असत. जवळच असलेल्या चक्रेश्वर मंदिर भजन कीर्तन चालत असेल एकदा अशी झाली देवाच्या नैवेद्याचे ताट ते मंदिरात घेऊन गेले असता तेथील मंडळी भूखी कष्टी असल्याचे महाराजांच्या निदर्शनास आले.नैवेद्याचे ताट त्यांनी मंदिरातील मंडळीला खाण्यासाठी देवुन टाकले. संताजी घरी परत आल्याने झालेला वृतांत आई वडीलांस सांगीतला अन्नाची गरज देवा पेक्षा मंदिरातील व्यक्तीना होती. म्हणून मि ताट दिले.महाराज माणसात देव पाहात होते.
जे काय रंजले गांजले त्यांशी म्हणी जो आपुल।
तोच साधु ओळखता देव तेथीची जाणावा।।
अशी त्यांची मनोवृत्ती होती. महाराजांचे अल्प शिक्षणानंतर त्याची पारंपरिक व्यवसाय तेल गाळने व विकणे या व्यवसायाकडे वळले व वडीलांच्या व्यवसायात मदत करू लागले सदरील कालखंडात बाल विवाहाची परंपरा होती संताजी महारांजांचे वय अवघे १२ वर्ष व त्यांची यमुनाबाई यांचे वय सात वर्षे असतांना त्याचे लग्न झाले परंतु विवाह बंधनात अडकला मुळे त्यांच्या वेळ संसारात जाऊ लागला खरा पण लहानपणापासून झालेल्या धार्मिक संस्कारामुळे त्यांचे म्हण संसारात लागत नव्हते. त्यामुळे त्यांचे मन भजन कीर्तन व सामाज कार्यात अग्रेसर राहू लागले योगा-योग्य म्हणजे संत तुकाराम महाराजांची व जगनाडे महाराजांची सासुरवाडी एकच होती ती म्हणजे "खेड"
चाकण येथे चक्रेश्वरांचे मंदिर आहे तेथे संत तुकाराम महाराजांचे किर्तन होत असे व संताजी नित्यनेमाने किर्तन श्रावणास जात असत त्यामुळे त्यांची आध्यात्माकडे ओढ निर्माण झाली. चाकण येथे चक्रेश्वर याचे मंदिर आहे तेथे संत तुकाराम महाराजांचे कीर्तन होत असे व संताजी नित्यनियमाने कीर्तन-श्रवणाचा जात असत त्यामुळे त्यांची अध्यात्माकडे ओढ निर्माण झाली. अंन्तरीक चैतन्याची अनुभूती येण्यासाठी माणसाला दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा लागतो. त्याच प्रमाणे संताजी महाराजांचा जीवनाला संत तुकाराम महाराजांचा "स्पर्श" असाच महत्वपूर्ण होता तुकाराम महाराजही संसारात राहूनही परमार्थ करता
येतो असा हितोपदेश संताजीना केला संत तुकाराम महाराजांचे सोबत राहून त्यांची अभंगे तोंडपाठ करणे व लिहिणे हे त्यांचे नित्यकर्म झाले.तुकाराम महाराजांच्या प्रमुख १४ टाळक-यात त्यांची गणना होऊ लागली व तुकाराम महाराजांचे लेखक म्हणून लोक ओळखू लागले संताजी महाराजांना तुकाराम महाराजांचा १६ वर्षे सहवास लाभला.
संताजी तेली बहुत प्रेमळ।
अभंग लिहित बैस जवळ।
धन्य त्याचे भाग्य सबळ।
संग सर्वेकाळ तुकोबांच्या।।-
संत गोपाळ महाराज {संत तुकाराम महाराजांचे नातू}
तत्कालीन सनातन्यांना संत तुकाराम महाराजांची वाढती लोकप्रियता आवडली नाही त्यामुळे तुकाराम महाराजांचा विरोध करू लागले.
त्यांचा छळ करण्यास सुरुवात झाली इतकेच काय तर त्यांनी लिहीलेली सर्व अभंगांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवून नष्ट केली गेली.
परंतु संत संताजी जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांचे लिहिलेले अभंग तोंडपाठ असल्यामुळे सर्व अभंग पूर्ण पुन्हा लिहून काढले.
त्याच बरोबर संताजी महाराजांनी "शंकर दिपीका" "योगाची वाट" "निर्गुणाचे लावण्य" "तेल सिंधु" इत्यादी ग्रंथांची निर्मिती करून संत अभंगाद्वारे लोकजागृतीचे काम केले.
१)भक्ती ते माऊली माझे नच पोटी । जाणे उठाउठी देवराया।।
भक्ती या भावाची करुनिया लाट। अलगितो तीस रात्रदिन"२"संत म्हणे आपल्या कृपेचा प्रसार।घ्यावा मजलागी मजलागी "३"
२]आणिक ते तेल घेतले कोणी। गो-या कुंभारांनी चोख्या महाराजांनी।।
तसेच घेतले नरहरी सोनारांनी।। संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल।त्यांचे तुम्हा मोल देईल पांडुरंग।।
अशा प्रकारच्या अनेक अभंगांची निर्मीती त्यांचे नावांवर आहे. संताजी महाराजांच्या शेवटच्या क्षणी (इहलोकीचा त्याग) केल्यानंतर तुझ्या मुठ मातीला येणार असे वचन दिले होते. संत तुकाराम महाराज हे संताजी महाराजांचा अगोदरच वैकुंठवाशी झाले होते. तदनंतर जेव्हा संताजीने देह ठेवला तेव्हा अंतिम समय संताजी महाराजांचे शरीर कितीही प्रयत्न करून झाकल्या जात नव्हते त्यांचा चेहरा उघडाच राहत होता. तेव्हा वचनाप्रमाणे संत तुकाराम महाराज वैकुंठावरून परत येऊन तीन मुठ मृतीका टाकली व संताजी महाराजांचा देह झाकला गेला आपल्या पार्थिव शरीराचा त्याग करून संताजी महाराज ब्रह्मलीन झाले अशी आख्यायिका आहे. इस १६८८ ला मार्गशीष वद्य त्रेयोदशीला महाराज वैकुंठ वाशी झाले.
भारताचा राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्या काळात दि.९ फेब्रुवारी २००९ ला संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या सन्मानार्थ भारत सरकारने पोस्टल तिकीट प्रसिद्ध केले. जसे जसे उंच जावे तो तो आकाशांच्या कक्षा रुंदावत जातात त्याच प्रमाणे संत जगनाडे महाराजांचे चरित्र व कार्याचा आवाकाही ही प्रचंड मोठा आहे. हा अल्पसा जीवनगाथा जयंती निमित्त त्यांचे चरणी सादर करतो.
न्यून ते पुरते। अधिक ते सरते।। करून घ्यावे हे तुमते। विनवितु असे।।
हरी ओम तत्सत. दिव्यत्वाची जेथे प्रचिती। तेथे कर माझे जुळती।।