एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 1 )
ज्या त्या काळात आपल्या कर्तुत्वाने काहींनी सुर्यच कवेत घेतला होता तो घेताना पोळले, भाजले, तडफले पण सुर्या जवळ जाऊन तो सुर्य प्रकाश चारही दिशेला पोहच करणारी दुर दृष्टी असलेल्या काही महान व्यक्ती त्या काळात होऊन जातात. त्यांच्या कार्याचा आदर्श हा शेकडो वर्ष नंदादिप आसतो. तो तेवत ठेवणे ही समाजाची जबाबदारी आसते. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे ही एक असामान्य व्यक्तीमत्व. त्यांच्या जीवन कार्याचा शोध व बोध.
पुण्याच्या परिसरातील अंबेगाव हे गाव. आज ही आडवळणाचे सह्याद्रीच्या कुशीतले गाव. कृष्णाजी खंडुजी पन्हाळे आपला पंरपरेचा तेल घाना हा उद्योग ते करित होते. गाव तेंव्हा एका मोठ्या कुटूंबा सारखे. कृष्णाजी गावात आपली पत ठेवून होते. गावातील महादेवाच्या मंदिरात नियमित जाणार. त्याची भक्ती ही शक्ती मानत गाव देवळात रोज दिवा लावावा या साठी गावाने दोन एकर शेती दिली होती. या सर्वांवर घर चालवत होते.. 1846 रामचंद्र नावाचा मुलगा झाला. रामचंद्र यांना मिसरूड फुटू लागले तोच वडिल वारले. घर पोरके झाले. घरात मिळवता व कारभारी कोणच नाही. आशा वेळी ते बहिणीकउे पुण्याकडे निघाले .येथे काशीबा व्हावळ यांच्या घरी बहिण होती. हे असेच जीवन समोर आले. आशा वेळी काय करावे व जगावे हा प्रश्न उभा होता. पुण्याच्या लष्कर भागात इंग्रजी अधीकारी वसाहत होती. भांडवल नाही पण त्यांनी या भागातुन जुने मोडके फर्निचर कमी किंमतीत घेऊन रविवार व बुधवारी भांबुर्ड्याला (आजचे शिवाजीनगर) येथे आठवडी बाजारात विकण्यास सुरूवात केली. ते ही डोक्यावर घेऊन जात आसत. कष्ट, जिद्द व स्वच्छ व्यवहार या बळावर चार पैसे साठवले. लष्कर भागात लोडीस बावडी समोर नजरत बेकरीसमोर दुकान घेऊन उद्योग सुरू केला. राणुजी वाव्हळ यांच्या मुलीशी विवाह झाला यांना सात अपत्यें होती. 1) भाऊसाहेब, 2) गणपत 3) नाना 4) यशोदाबाई 5) किसनशेठ 6) यशोदाबाई 7) नाना शंकरशेठ उर्फ रावसाहेब पन्हाळे. लाठ उचलली दुसरे गाव गाठले. शहरात आल्यावर तोच व्यवसाय न करता नवा व्यवसायात शिरले 1864 च्या पुर्वी गावात असताना वडील हे महादेव मंदिरात नियमीत जात. पुण्यात आल्यावर महादेव ते विसरले नाहीत. आधाराला आलेले रामचंद्र शेठ हे आता पुण्यात शेठ म्हणुन नावा रूपाला आले. त्यांची काही अपत्ये कमी वयात गेली. पण यावर मात करून व्यवसाय करीत होते.
1896 ला हाहाकार माजला. अपरिचित असा प्लेग पुण्याच्या शिवेवरून मुक्कामाला आला. पुणे कॅम्प मध्ये लष्करी वस्ती इथे करडी नजर उंदीर दिसला किंवा कोण साधे आजारी पडले तरी लष्करी अधीकारी. घरात हाजर झडती घेऊन घरदार सोडावयास लावत एवढी दहशद आणी छळ होता. एक दिवस रामचंद्र शेठना ताप आला आणी पहाता पहाता आजार प्लेगकडे गेला. एक दिवसातच प्लेगने त्यांना संपवुन टाकले. पुढे काय हे प्रेत काशीबाईंनी घरातील खुर्चींच्या गोदामात लपवुन ठेवले. एक मुलगी, किसनशेठ व रावसाहेब ही मुले होती. स्वत: व मुलांना ही रडू दिले नाही. सकाळी लष्कर घर तपासायला आले त्यांना शंका होतीच पण काही सापडले नाही काशीबाई दु:खावर दगड रचून उभी होती. मोजकीच माणसांना बोलावून अंतविधी उरकला. ही बातमी लष्कराला समजली सर्वांना बाहेर काढून घराला कुलूप लावले. ही माऊली आपल्या चिमणी पाखरांना घेऊन निवारा साठी फिरू लागली. ही स्वाभीमानी माऊली डगमगली नाही. किसनशेठ बारा वर्षीचे व रावसाहेब तेंव्हा पाच वर्षांचे होते. थोडी समज किसनशेठ यांना होती. आधार शोधतांना रावसाहेबांना ताप आला. वेदना असाह्य होत होत्या. प्लेग सर्व पन्हाळे कुटुंबाला संपवू पहात होते आशा वेळी रावासाहेबाना पाठीशी बांधले, किसन व यशोदा यांना बरोबर घेतले व आंधार्या रात्री ही माऊली ‘माझा हा पोर जगला पाहिजे’ यासाठी हडपसरकडे निघाली. काळाकुट्ट अंधारात वाटेत वस्ती नाही. पण लष्काराचा पहारा ही माऊली त्यांना चुकवत तीने पडळ गाठली. या ठिकाणी तिन दगडाच्या चुलीवर भाकरी बनवुन पोर जगवु लागली. धन्य ती माता व धन्यतीची जिद्द.
रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे कुठे कळु लागले त्या काळातच प्लेगने धुमाकुळ माजवला. वडीलांचा आधार तुटला. घरात आई व भाऊ. वडीलांनी जे कमवले ते अडचणीत गेले सगळेच खाचखळगे त्यात सावकारी फास पण आशा वेळी आईने कंबर कसुन घर सावरू लागली.