एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 6)
आज महाराष्टात घराघरात संत संताजींचे किमान नाव तरी कोरले आहे. पण 1920 च्या दरम्यान ते काही नव्हते. पुर्व सुरूच्या मंडळींनी संताजी हे नाव काही भागात पोहचं केले होते. रावसाहेबांनी व्यवसाया साठी फिरताना शहरात तेली समाज शोधला. अनेक भागात समाजाच्या शाखा.परत त्या शाखेत अनेक फळ्या. त्यात ते संताजी उभा करीत होते. नुसता संताजी उभा करून हे भेद संपणार नाहीत तर येथे रोटी बेटी व्यवहार झाले पाहिजेत, आपल्या शाखा विसरून आपण एक झाले पाहिजे. ही आग्रहाची भुमीका ते मांडून थांबले नाहीत. तुमसर येथील लांजेकर, वर्धा येथील वनमाळी डिग्रज येथील महिंद्रे पाटील व इतर काही ठिकाणी त्यांनी प्रथम घरातील व नात्यातील मुली दिल्या व पोट जाती कृतीतून नष्ट करू लागले. हा इतिहास आज ‘पोटजाती विसरा‘ सांगणार्या बांधवांना माहित नाही. या पेक्षा ही रावसाहेबांचे मोठेपण मांडतो. ते एक संस्थेचे अध्यक्ष होते. संस्थेचे नाव पोट जातीने सुरू होत होते. त्यांनी समाज जागृती सुरू केली. फक्त तेली नाव ठेवू. संस्थेच्या सभेत हा विषय मांडला सभासदांनी विरोध केला. भविष्याचा वेध घेणारा विचार समाजाला पटवु शकत नाही. आशा वेळी त्यांनी समाज संस्थेची धुरा सोडुन दिली. विशेष म्हणजे 1956 साली त्यांनी आग्रहाने सुदुंबरे संस्थेच्या आमसभेत ठराव केला होता कि आता पोटजाती विसरून रोटी बेटी व्यवहार सुरू करा या मंजुर ठरावाची अंमल बजावणी काही ठिकाणी झाली. काही ठिकाणी प्रखर विरोध झाला. त्यास ही ते सामोरे गेले.