एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 7)
1985 च्या दरम्यान मला समजले लष्कर भागात भोपळे चौकात रावसाहेब केदारी यांच्या समोर त्यांच्या प्रेरणेने श्री संताजी वाचनालय सुरू आहे. मी गेलो मला बरेच लेखन अभ्यासता आले. याचे अध्यक्ष रावसाहेब होते. व स्वातंत्र्य सेनानी मुरलीधर व्हावळ सचिव होते. समाज बौद्धिक बाबत सक्षम बनावा ही या संस्थेची बैठक होती. या मार्फत महिलांना शिवणकाम संगीत चित्रकला व महिला विकास गृह चालवले जात आसे वीर मंडळ व संताजी स्वयं सेवक पथक तयार केले होते. बौद्धीक व साने गरुजी कथा माला होत. मुरलीधर व्हावळ यांच्या विचार धारेला ते मुर्तीरूप देत. त्या काळात संत संताजीमय समाज इतका होता की प्रसंगी सायकलवर किंवा पायी सुदूंबर्यांत जात स्वयंसेवक ही जबाबदारी पुरूषोत्तम शेठ व्हावळ संभाळत. स्वच्छता तंबु ठोकणे व निवारा या सर्व बाबी या संस्थे तर्फे होत. रावसाहेब ही एक स्वयंसेवक म्हणुन वावरत असत.