एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 8)
खडीच्या मैदानातील नागेश्वर मंदिरात ते जात. हिंदु व इतर हा भेद त्यांच्या जवळ नव्हता. आपल्या कारखान्यात कुशल मुस्लीम व शेख धर्मीय ठेवत आसत. त्यांच्या धार्मीक उत्सवात सहभाग घेत. एक वेळ घरा समोर एक पठाण एका वयोवृद्ध बांधवा कडून कर्ज वसुली साठी शिवीगाळ व मारझोड करीत होता. तेंव्हां रावसाहेब गेले व त्यांनी समजुतीच्या गोष्टी सांगीतल्यापणा तो एैकेना तेंव्हा तालमीत कसलेल्या पैलवानाला झोडपला तो पंधरा वीस पठाण घेऊन आला. तोच त्यातील 2/3 जनांनी रावसाहेबांकडे पाहिले त्यांना रावसाहेब कसे आहेत हे माहित होते. त्या पठाणांनी आपला जमाव शांततेत परत नेहला. त्यांनी हिंदु बरोबर अनेक धर्मीक स्थळांना मदत केली.